आयईसी मार्गदर्शिका Art work for SS-2019 Citizens feedback seven questions jpg fil Art work for SS-2019 Citizens feedback seven questions CDR files कचरामुक्त शहरे : साधनपुस्तिका ODF+ ODF++ प्रोटोकॉल सर्वेक्षण 19 साधनपुस्तिका

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)

देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे या करिता या शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील सर्व नागरीकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देवून हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, हे अभियान 2 ऑक्टोंबर, 2014 पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मदिनापर्यंत म्हणजे 2 ऑक्टोंबर 2019 पर्यंत संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान (नागरी) देशामध्ये एक अभियान म्हणून राबविण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाने प्रसिध्द केल्या आहेत.

राज्यात 27 महानगरपालिका व 357 नगरपरिषदा अशा एकूण 384 नागरी ‍ स्थानिक स्वराज्य संस्था असून, सन 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची नागरी लोकसंख्या 5,08,27,531(राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 45.23 टक्के) एवढी आहे. तर, नागरी भागातील एकूण कुटुंबांची संख्या 1,08,13,928 एवढी आहे. त्यापैकी साधारण 29टक्के कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. शौचालयाची सुविधा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांपैकी साधारण 73टक्के कुटुंबे सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत आहेत. तर, साधारण 27 टक्के कुटुंबे उघडयावर शौचालयास जात आहेत.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामधील सर्व शहरांमधील उघडयावर शौचालयास जात असलेल्या कुटुंबांना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी व शहरांमधील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत भियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” हे एक अभियान म्हणून राबविण्यात येत आहे. या अभियानाचा कालावधी 2 ऑक्टोबर, 2019 पर्यंत राहील


अभियानाचा उद्देश :

उघडयावरील शौचविधी बंद करणे. 
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांना या कामातून मुक्त करणे. 
नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक व शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब करणे. 
स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतीच्या अनुषंगाने सवयींमध्ये बदल करणे. 
स्वच्छते विषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे. 
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता वाढविणे. 
भांडवली खर्च आणि ऑपरेशन आणि देखभाल यासाठी खाजगी संस्थांच्या सहभागासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करणे. 


अभियानाचे धोरण :

स्वच्छतेचा व्यापक आराखडा ज्यामध्ये- 
शहर स्तरावरील स्वच्छतेचा आराखडा. 
राज्याची स्वच्छतेची संकल्पना. 
राज्याचे स्वच्छतेचे धोरण. 
सवयींमध्ये बदलाचे धोरण आणि माहिती, शिक्षण व संपर्क. 
खाजगी संस्थांच्या सहभागासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करणे. 
क्षमता बांधणी. 
 

विशेष लक्ष केंद्रित करणे-

नागरी भागातील हाताने मैला उचलणाऱ्या सर्व सफाई कामगांरांचा शोध घेवून ते काम करीत असलेल्या इन-सॅनिटरी शौचालयांचे सॅनिटरी शौचालयामध्ये रूपांतर करून त्या मैला सफाई कामगारांना या कामामधून मुक्त करून त्यांचे पुनर्वसन करणे.

घनकचरा व्यवस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या (rag pickers) कामाच्या स्थितीत सुधारणा करणे. स्थलांतरीतांसाठीच्या सर्व तात्पुरत्या निवासस्थानात व शहरी बेघरांसाठीच्या निवासस्थानात शौचालयाची पुरेशी व्यवस्था करणे. शहरी भागातील बांधकामांवर काम करणाऱ्या कामगारांना तेथेच तात्पुरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करण्याचे अनिवार्य करणे. सेवानिवृत्त, लहान मुली, गर्भवती व स्तनदा माता यांच्यासाठी वैयक्तीक घरगुती शौचालय बांधकामामध्ये प्राधान्य देणे.

महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी नगर विकास विभागांतर्गत स्वतंत्र स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालय निर्माण करण्यात आले आहे. या अभियानाची अंमलबजावणी शहरस्तरावर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत करण्यात येत आहे.